बेळगाव : सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री होऊन खूप चांगले काम केले आहे. विरोधी पक्षनेत्यांना आता निवृत्तीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतलेली चांगली अशी उपहासात्मक टीका वन तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी आज केली.
अल कायदा प्रमुख अल जवाहीर यांच्याकडून मुस्कानचे कौतुक होत असणारा व्हीडिओ भाजपने बनवला असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. त्यावर उमेश कत्ती यांनी आज पलटवार केला. ते म्हणाले, हिंदू-मुस्लिम मूर्तिकारांनी देवतांच्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यांची आज सर्वत्र पूजा केली जातेय. त्यामुळे हा विषय येथेच सोडून द्या, सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी यांनी आता कृपा करून राजकारणातून निवृत्त व्हावे, हेच चांगले असे उमेश कत्ती यांनी सांगितले.
हिंदू-मुस्लिम संघर्षाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, देशात हिंदुत्ववादी संघटनांनी एकदाच मोहीम सुरु केली आहे. कर्नाटकातही तेच घडतेय. ही आधीपासून चालत आले आहे. ते एकदम थांबवता येत नाही. टप्प्याटप्प्याने 10 वर्षात थांबेल असे कत्ती म्हणाले. कत्ती म्हणाले, समाजात वेगवेगळ्या जाती-धर्म असतात. त्यांच्यात कुठेतरी संसंघर्ष सुरु असतो. सरकारला यात अचानक हस्तक्षेप करता येत नाही. पण कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सरकार करते. विकासकामे करते. समाजात अनेक घडामोडी दररोज घडत असतात. त्या सगळ्यांवर सरकारला उत्तर देता येत नाही. मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करू शकतात. मी माझ्या खात्यांपुरती मर्यादित राहून काम करतो असे कत्ती यांनी स्पष्ट केले.
Check Also
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 20 वे येळ्ळूर ग्रामीण …