Saturday , October 19 2024
Breaking News

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टिम’ समजून घेणे आवश्यक! : श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

Spread the love


भारताची मुख्य सुरक्षा यंत्रणा असलेल्या राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दंगल होते, हे लज्जास्पद आहे. हे सर्व अचानक झाले नसून हे सर्व पूर्वनियोजित होते, असे आता समोर येत आहे; मात्र अशा दंगली काही नवीन नसून नेहमीच विविध दंगलीत हिंदूंवर दगडफेक आणि आक्रमण करणारे धर्मांध मुसलमान असतात. हे जगभर चालू आहे. या आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी पुढे येणारे अधिवक्ता, तथाकथित मानवाधिकारवाले, इस्लामी संघटना आणि हिंदूंची मानहानी करणारी प्रसारमाध्यमे या टोळीची ‘इकोसिस्टिम’ हिंदूंनी समजून घेणे आवश्यक आहे. तरच या टोळीच्या विरोधात लढता येईल. या टोळीचा पराभव करण्यासाठी हिंदूंनी स्वत:ची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. देशभरात अनेक राज्यांत हिंदूंची मंदिरे, मठ तोडल्यावर त्यावर न्याय द्यायला न्यायालयाला वेळ नसून अतिक्रमण केलेल्या धर्मांधांच्या विरोधातील कारवाईवर स्थगिती आणण्यासाठी न्यायालय अन् येथील संपूर्ण यंत्रणा तत्परता दाखविते हे लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
दिल्ली उच्च न्यायालयाचे अधिवक्ता युधवीर सिंह चौहान म्हणाले की, दिल्ली येथे नुकतीच झालेली दंगल हे आपल्या यंत्रणेचे मोठे अपयश आहे. पुढे अशा प्रकारच्या दंगली किंवा आक्रमणे होणार नाहीत अशा प्रकारची कारवाई आणि तपास पोलीस अन् सरकारी यंत्रणांकडून झाला पाहिजे. दंगली घडविणारे जे अवैधरित्या या देशात राहत आहेत त्यांची ठिकाणे, तसेच त्यांचे आर्थिक स्त्रोत काय आहेत याच्या मुळापर्यंत सरकारने पोचणे आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना देशाबाहेर हाकलून देणे गरजेचे आहे. दिल्लीतील दंगलखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमीयत उलेमा ए हिंद’ यांसारख्या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी. या संघटना ‘हलाल सर्टिफिकेट’च्या माध्यमातून पैसा गोळा करत आहेत. फक्त हिंदूंचे सण नव्हे तर ख्रिश्चनांच्या ‘ईस्टर’ सणाच्या दिवशीही स्पेन आणि स्वीडन येथे ख्रिस्ती बांधवांनी काढलेल्या मिरवणुकांवरही धर्मांध मुसलमानांनी दगडफेक करून आक्रमणे केली. केवळ भारतच नव्हे, तर जगभरात जिथे जिथे धर्मांध मुसलमानांची संख्या वाढत आहे. तिथे अशी आक्रमणे सुरूच आहेत. आपल्या पूर्वजांनी परकियांची अनेक आक्रमणे थोपवून त्याविरोधात लढा दिला तसा लढा आता आपल्याला द्यावा लागणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *