Saturday , October 19 2024
Breaking News

शिव-बसव जयंती, ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती, जगदज्योती श्री बसवेश्वर जयंती आणि मुस्लिमांचं पवित्र रमजान ईद शांततेने सौहार्दपूर्वक निश्चितच पार पाडली जाईल, असे संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले.

ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित शांतता कमिटीच्या सभेला उद्देशून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थान संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, मराठा समाजाचे प्रमुख श्रीकांत हतनुरी, मुस्लिम समाजाचे मुक्तार नदाफ यांनी भूषविले होते. प्रल्हाद चन्नगिरी पुढे म्हणाले, शिव-बसव जयंतीची रितसर पोलिसांकडून परवानगी घेतली गेली पाहिजे. शिव-बसव जयंती आयोजकांनी मिरवणुकीची संपूर्ण जबाबदारी उचलली पाहिजे. मिरवणुकीत डॉल्बीला परवाणगी दिली जाणार नाही. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यास अनुमती दिली जाईल. मुस्लिम बांधवांनी चंद्रदर्शनानंतर रमजान ईद (ईद ईद-उल-फित्र ) साजरी करताना पैगंबरांच्या शांततेच्या संदेशाचे पालन करावे. ईदची नमाज ईदगाहवर पठन करण्यास अनुमती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी म्हणाले, शिव-बसव जयंती आणि रमजान ईद शांततेने सौहार्दपूर्वक साजरी करताना सर्वांनी बांधुभाव पाळावा. हिन्दू-मुस्लिम भागणार कायम ठेवावा असे सांगितले. यावेळी श्रीरामसेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर यांनी शिवजयंती मिरवणुकीत डीजे लावण्यास पोलिसांनी परवानगी द्यावी अशी मागणी केली.

सभेला संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, कुमार बस्तवाडी, अविनाश नलवडे, जयप्रकाश सावंत, दिलीप होसमनी, नगरसेवक जितेंद्र मरडी, महेश हट्टीहोळी, मोमीन समाजचे अल्ताफ कारेकाजी,अन्वर मेहदी, सुन्नत जमातचे इमामसाहेब अत्तार, रियाज फणीबंद, अल्ताफ शाहेण्णावर, प्रदीप कर्देगौडा, संतोष कमनुरी, बबलू मुडशी, हिन्दू-मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि आभार हवालदार बी के. नांगनुरी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *