Saturday , October 19 2024
Breaking News

….बेळगावात अवतरली शिवसृष्टी!

Spread the love

 

 

 

 

 

 

 

 


बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. कोरोनाचे सावट दूर झाल्याने प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित केले.
पारंपरिक सनई, टाळ-मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता मिरवणुकीचे उद्घाटन झाले. मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, किरण सायनाक, मालोजी अष्टेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, भाजपचे नेते किरण जाधव आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली.


मिरवणुकीच्या शुभारंभाला सनईच्या सुरांची साथ
नरगुंदकर भावे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाले. पारंपरिक पद्धतीने प्रथम अनगोळ येथील श्रीकृष्ण सनई यांचे सनईवादन झाले. सनई-चौघड्यांच्या मंगल सुरांमध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली. वडगाव येथील भजनी मंडळाने अखंड नामजप करत लक्ष वेधून घेतले होते.
रणरागिणींच्या ध्वजपथकाने वेधले लक्ष
बालिका आदर्श विद्यालयाच्या रणरागिणी ध्वजपथकाने शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. 125 हून अधिक ध्वजधारी बालिका यामध्ये सहभागी झाल्या होत्या. हातात नाचविले जाणारे भगवे ध्वज आणि त्यांनी दिलेली सलामी अनेकांना उत्साही बनवत होती. या ध्वजपथकाला नरवीर ढोल-ताशा पथकाच्या 60 वादकांनी तितक्याच तोलामोलाची साथ दिली.
अग्रभागी असलेल्या पालखीच्या बरोबरीने स्थानिक भजनी मंडळांचे पथक दाखल झाले होते. यापाठोपाठ चित्ररथ येत होते. उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, मदन बामणे, सुहास किल्लेकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, तालुका पंचायत माजी सदस्य सुनील अष्टेकर, चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, लक्ष्मण होनगेकर, गणेश दड्डीकर, प्रकाश मरगाळे, वैजनाथ पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, राजू पिंगट, शिवराज पाटील, धनंजय पाटील, सूरज कणबरकर, युवा सेनेचे विनायक हुलजी, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, माजी महापौर विजय मोरे, किरण धामणेकर, अभिजित मजुकर, महादेव चौगुले, वीरेश किवडसण्णावर, मेघन लंगरकांडे व मान्यवर उपस्थित होते.
वैविध्यपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण
वैविध्यपूर्ण प्रसंगांचे नेमके सादरीकरण हे यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीचे वैशिष्टय ठरले. विशेष म्हणजे महिलांनीही स्वतंत्रपणे देखावा सादर करून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले.
महिलांनी साकारला देखावा
ताशिलदार गल्ली येथील चित्ररथावर महिला व युवतींनी सुरतेची लूट हा अप्रतिम सजीव देखावा सादर केला. या देखाव्यात पुरुषांचीही पात्रे महिलांनीच साकारली. त्यामुळे शिवरायांचे खरे विचार या देखाव्यातून पहावयास मिळाले. स्वाती चौगुले हिने वठविलेली शिवाजी महाराजांची भूमिका वाहवा मिळवून गेली. महिलादेखील संधी मिळाल्यास आपल्या कलागुणांनी त्याची सुवर्णसंधी करू शकतात, हे या देखाव्यातून पहावयास मिळाले.

अन् सार्‍यांच्याच अंगावर आले शहारे
पवार गल्ली-शहापूर येथील ओमकार तरुण मित्र मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या अत्याच्यावरील प्रसंगाच्या देखाव्याचे सादरीकरण केले. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला आपण मृत्यूलाही घाबरत नाही हे दाखवून दिले. याचे सादरीकरण करून सार्‍यांचीच वाहवा मिळविली. या प्रसंगाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

 

 

अनेक चित्ररथांसमोर लढायांचे प्रसंगही उभे करण्यात आले होते. अलीकडच्या काळात शिवजयंती उत्सवात वापरण्यात येणार्‍या डीजेचा प्रकार मात्र यंदाच्या निवडणुकीत किंचित कमी दिसून आला. यामुळे बहुतांशी चित्ररथांसमोर पारंपारिक वाद्यवृंद, लेझीम पथक, वारकरी संप्रदायातील भजनी मंडळाचे सादरीकरण आणि ढोल-ताशांचा दणदणाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात चित्ररथ मिरवणूकीत दाखल होत आहे. जवळपास 55 हून अधिक चित्ररथ मिरवणुकीत सामील झाले होते. शहरातील अनेक मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *