Saturday , October 19 2024
Breaking News

हिडकल जलाशयातून घटप्रभावरील कालव्याला पाणी पुरवठा करण्याची मागणी

Spread the love


बेळगाव : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या असून पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत चालली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि जनावरांना बसत असून गोकाक आणि मूडलागी परिसरातील शेतकरी या समस्येमुळे अडचणीत आहेत. हिडकल जलाशयातून घटप्रभा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. मानुष्यासह जनावरांनाही जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. सध्या उन्हाळी हंगाम सुरु असल्याने अनेक भागात पाण्याच्या टंचाईची समस्या उद्भवली आहे. गोकाक आणि मूडलगी येथील शेतकऱ्यांनाही या समस्येला सामोरे जावे लागत असून हिडकल जलाशयातून घटप्रभा वरील कालव्यात २ हजार क्युसेक पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी बेळगावमधील कर्नाटक पाटबंधारे निगमच्या चीफ इंजिनियर यांच्या कचेरीला घेराव घातला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एका शेतकऱ्याने सांगितले, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी घटप्रभा नदीवरील कालव्यातील उजव्या आणि डाव्या बाजूला उन्हाळी हंगामात २ हजार क्युसेक पाणी सोडण्यासंदर्भात आरसी आणि सीईना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कळविले आहे. मात्र अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. मागीलवेळी सोडण्यात आलेल्या अपूर्ण पाण्यामुळे केवळ ७५ किलोमीटर व्याप्तीतील शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा झळा मात्र इतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही आणि आणखीन समस्या वाढली, धरणात पाणीसाठा असूनही अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आरसी कार्यालयात आलेल्या शेतकरी आंदोलकांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त नजमा पिरजादे यांना निवेदन सादर करून आपली समस्या मंडळी. यावेळी विभागीय आयुक्तांनी पाणी सोडण्याचा आदेश आरसींना दिला.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *