Saturday , October 19 2024
Breaking News

ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जफेडीची मुदत वाढवून द्यावी : शेतकऱ्यांची मागणी

Spread the love


बेळगाव : बेळगाव तालुक्यातील चंदन होसूर येथील शेतकऱ्यांनी तालुका प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँकेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात यावी, असा आग्रह करण्यात आला आहे.
बेळगावमधील महाद्वार रोडजवळील तालुका प्राथमिक सहकारी कृषी ग्रामविकास बँकेसमोर नेगीलयोगी संघाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. यासंदर्भात सुरेश नागाप्पा नागनूर यांनी माहिती देताना सांगितले, ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेण्यात आले होते. सदर कर्ज परत फेड करण्यात येईल. मात्र यासाठी आणखी ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात यावी आणि पीएलडी बँकेने शेतकऱ्यांचे हित जपावे. या बँकेने फायनान्स कंपन्यांप्रमाणे वर्तन करू नये, असा आग्रह त्यांनी केला. ट्रॅक्टर खरेदीसाठी ८ लाखांचे कर्ज घेण्यात आले आहे. यापैकी १ लाखांची एफडी आणि ८५ हजार रुपये भरण्यात आले आहेत. अवकाळी आणि अतिवृष्टीचा फटका बसल्याने यंदा शेतकरी अडचणीत आहेत. यामुळे आणखी ६ महिन्यांचा वाढीव कालावधी मिळावा, असा आग्रह त्यांनी केला. केवळ शेताच नुकसान झाले नसून अनेक शेतकऱ्यांच्या घरीही पडझड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची कुटुंबं सध्या अडचणीत असून बँकेने सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. सदर बाब बँकेला सांगण्यात आल्यास जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आल्या कारणाने शेतकऱ्यांनी १ लाख रुपये भरल्यास ट्रॅक्टर पुन्हा परत देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती सुरेश नागनूर यांनी दिली.
कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यांनी मागितलेला ६ महिन्यांचा अधिक अवधी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे वाढवण्यात आला असून शेतकऱ्यांना देखील १ लाख रुपयांची रक्कम भरणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *