बेळगाव : मूळचे सावंतवाडी येथील वासुदेव हरी टोपले यांचे बेळगाव येथे येळ्ळूर केएलई इस्पितळात वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८८ वर्षाचे होते.
त्यांच्या निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांना माहिती मिळाल्यानंतर लागलीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला व मध्यरात्री त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या नेत्रदानामुळे दोघा अंध व्यक्तींना ही सृष्टी पाहता येणार आहे. केएलईच्या डॉ. ध्रुव गोयल, डॉ. ईशा सवानी आणि डॉ. कीर्ती मंजुनाथ यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा राधिका कलघटगी यांचे ते वडील होत.