Saturday , October 19 2024
Breaking News

250 लाख अनुदानामध्ये बेळगांव शहरात विकासकामांना आमदार अनिल बेनके यांच्याकडून भुमिपुजनाने सुरूवात

Spread the love

बेळगांव : बुधवार दिनांक 11 मे 2022 रोजी बेळगांवमध्ये एकुण 250 लाख अनुदानातून बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी रोड पुन:डांबरीकरण, सीडी ड्रेन, सीसी रोड अशा अनेक विकासकामांना भुमिपुजनाने सुरुवात केली.
या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, बेळगांव शहरात सध्या विकासकामे चालु स्थितीत आहेत तर काही पुर्ण केली गेली आहेत. जनतेच्या सहकार्याने व आशिर्वादाने आज बेळगांवमध्ये 250 लाख अनुदानातुन विकासकामे करण्यासाठी भुमिपुजन केले आहे. ही कामेसुद्धा लगद पुर्ण करण्यात येतील.
शहरातील रिसालदार गल्ली ते गणपत गल्ली कॉर्नर येथे चव्हाट गल्ली रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, नानापाटील चौक ते कोर्ट कंपाउंड येथे चव्हाट गल्ली रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, बसव कॉलनी बसव मंदिर ते बॉक्साईड रोड येथे बसव कॉलनी रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, बसव कॉलनी 6वा क्रॉस येथे रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, क्लब रोड येथे रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, विनायक नगर मेन रोड येथे रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, सदाशिव नगर 3रा क्रॉस येथे रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, सदाशिव नगर 4था क्रॉस येथे रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, सदाशिव नगर उप्पीन बिल्डिंग ते चंद्रक्रिती हाउस येथे रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, बसवाण्णा मंदिर ते बॉक्साईड रोड येथे नेहरु नगर रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, वार्ड 39 ट्रेजरी ऑफिस येथे विश्वेश्वरय्या नगर रस्त्याच्या पुन:डांबरीकरणाचे काम, भोवी गल्ली येथे सीसी रोड चे बांधकाम, वार्ड 39 अपोलो फार्मसी ते मेघधुत अपार्टमेंट येथे काळी अमराई सीसी रोड चे बांधकाम, क्लब रोड ते के.एल.ई कॅम्पस येथे क्लब रोड सीसी ड्रेनचे बांधकाम, टी.व्ही. सेंटर लक्ष्मी निवास समोर सीसी ड्रेनचे बांधकाम, जाधव नगर येथे सीडी बांधकाम सारख्या विकासकामांचे आज भुमिपुजन केले. या संदर्भात आमदारांसमवेत संबंधित अधिकारी, कंत्राटदार, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *