नवी दिल्ली : देशभरात महागाईनं जोर धरला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस बेजार झाले आहेत. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 1000 पार पोहोचल्या आहेत. आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर 8 रुपयांनी महागला आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये 50 पैशांनी महाग
देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 14.2 किलोंचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1003 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे. आज, एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांवर पोहोचली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लागणार आहे, हे नक्की.
देशातील प्रमुख शहरं व घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर (14.2 किलोग्राम)
मुंबई : 1002.50 रुपये प्रति सिलेंडर
दिल्ली : 1003 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता : 1029 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई : 1018.50 रुपये प्रति सिलेंडर
देशातील प्रमुख शहरं व व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर
मुंबई : 2306 रुपये प्रति सिलेंडर
दिल्ली : 2354 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता : 2454 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई : 2507 रुपये प्रति सिलेंडर