नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौर्यावर जाणार आहे. मात्र, भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्याला विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येत पाय ठेवता येईल’ अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या’ अशी मागणी कांचनगिरी यांनी केली आहे.
कोण आहेत कांचनगिरी?
कांचन गिरी यांचा जन्म झारखंडमधील हजारी वाघ येथे झाला आहे. कांचन गिरी यांचे पूर्वज बिहारमधील आहेत. त्या मागील 25 वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत. त्यांनी निसर्गाशी निगडीत असणारे आणि सध्याच्या परिस्थितीत सुधारणा हवी अशी कामे केली आहेत. कांचन गिरी यांनी भारतासह परदेशात देखील शेतकर्यांसाठी काम केले. गंगा यमुना या नद्यांमध्ये निर्माल्य टाकलं जातं ते साफ-सफाई करण्याची मोहीम कांचनगिरी यांनी हाती घेतली होती. तसेच देशातील इतर मुख्य नद्या सफाई करण्याचे ध्येय हाती घेतले होते. देशात हिंदू धर्माचा प्रसार करण्यासह युरोपीय देशात देखील कांचनगिरी यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …