पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या 15 ठिकाणी सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एक टीम 10 सर्कुलर रोड इथंही पोहोचली आहे. जे राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडी निवासस्थानी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीममध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयच्या या पथकात एकूण 10 लोक आहेत जे राबरी निवासस्थानी चौकशी करत आहेत. यावेळी कोणालाही घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रेल्वे भरती प्रकरणी छापा टाकल्याची माहिती – सूत्र
राबरी निवासस्थानावर छापा टाकण्याबाबत सीबीआयचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. पण हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण रेल्वे भरतीशी संबंधित आहे. जेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
लालू आणि त्यांच्या मुलीवर पुन्हा गुन्हा दाखल
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने आरजेडी सुप्रीमो लालू यादव आणि त्यांच्या मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. लालू यादव यांच्या या नव्या प्रकरणासंदर्भात दिल्ली आणि बिहारमधील एकूण 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
रेल्वे भरतीमध्ये नोकरीच्या बदल्यात जमीन
हे संपूर्ण प्रकरण लालू यादव यांच्या रेल्वेमंत्री असतानाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरआरबीमध्ये लालूंच्या कार्यकाळात झालेल्या गोंधळाबाबत सीबीआयने छापे टाकले आहेत. 2004 ते 2009 या लालूंच्या रेल्वेमंत्रिपदाच्या काळात अनेकांना राइट ऑफ करून रेल्वेत नोकर्या दिल्याचा आरोप आहे. 7 जुलै 2017 रोजी लालूंच्या निवासस्थानावर शेवटचा छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी लालूंच्या 12 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.
लालूंच्या मुलीचे ट्विट…
लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य सीबीआयच्या छापेमारीनंतर संतापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले असून जातीगणनेवरून लालू यादव यांना घाबरवण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …