Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव भाजपमधील दुफळीच्या चर्चेला पालकमंत्र्यांच्या दुजोरा!

Spread the love

बेळगाव : बेळगाव भाजपमध्ये दुफळीचे राजकारण सुरु असल्याची बाब सर्वश्रुत आहे. आता या गोष्टीला स्वतः पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दुजोरा दिला आहे. बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये दुफळी असूनही आजच्या प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला सर्व नेत्यांची उपस्थिती असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
बेळगाव भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याची चर्चा सुरु असून या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी आज गोविंद कारजोळ यांना प्रश्न विचारले. यावेळी बोलताना गोविंद कारजोळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. हि दुफळी राजकीय नाही सर्व नेते एकसंघ होऊन काम करत आहेत. जारकीहोळी यांच्यासह सर्वच नेते आजच्या बैठकीला उपस्थित असून दोन्ही जिल्ह्यातील सर्वच नेते या बैठकीला उपस्थित असल्याचे ते म्हणाले.
पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत दोन्ही मतदार संघात भाजपचा विजय निश्चित आहे. हणमंत निराणी हे योग्य उमेदवार आहेत. अरुण शहापूर सक्रिय आहेत. शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण त्यांनी केले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात नक्कीच आपल्या पक्षाचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय राज्यात भाजप सरकार विकास कामे करत असून आपल्या पक्षाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मतदेखील पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.
सिध्दरामय्यांनी कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले. २०२३ साली होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा भाजपचं अधिकारात येणार. देशातील जनतेची काँग्रेसने फसवणूक केली आहे. जनतेला तांदूळ नाही स्वाभिमानाची आवश्यकता असून आजतागायत खोटेपणाने वागणारे काँग्रेस आता पिछाडीवर गेल्याचे पालकमंत्री म्हणाले.
राज्यात अचानक सुरु झालेल्या मान्सून पूर्व पासासामुळे उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले, पाऊस येणे हि चांगली गोष्ट आहे. सर्वसामान्य आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाऊस येणे हि चांगलीच गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांना या पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत अशा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी चिकोडी येथील बैठकीत देखील सूचना दिल्या आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बेळगावमध्ये आज भाजपच्या सर्व नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवर आपले मत पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *