बेळगाव : वायव्य पदवीधर मतदार, शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित नेत्यांना सर्वांनी एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याची कडक सूचना प्रल्हाद जोशींनी दिली.
बेळगाव जिल्ह्यात भाजपात दुफळी झाल्याचे दिसून येत आहे. या दुफळी मोडीत काढून पक्ष बळकट करणे आणि वायव्य पदवीधर मतदार, शिक्षक मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गोविंद कारजोळ, उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार भालचंद्र जारकीहोळी, आनंद मामनी, अनिल बेनके, महादेवाप्पा यादवाड, श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी, महांतेश दोड्डगौडर, राज्य भाजप उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी आदी सहभागी झाले होते. मात्र रमेश जारकीहोळी, अभय पाटील, पी. राजीव, दुर्योधन ऐहोळे आदी गैरहजर होते. या बैठकीत लक्ष्मण सवदी आणि भालचंद्र जारकीहोळी आजूबाजूला बसून कुजबुजताना दिसून आले.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले, सर्व आमदार, खासदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे, याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही निवडणुका जिंकण्यासाठी रणतंत्र आखण्यात आले आहे. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकसंघ होऊन हि निवडणूक जिंकलीच पाहिजे, यासाठी मतभेद दूर सारून एकसंघ येणे आवश्यक असल्याची कडक सूचनाही प्रल्हाद जोशींनी दिली. तिकीट वाटपाबाबत झालेल्या भेदभावासंदर्भात होत असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना प्रल्हाद जोशी म्हणाले, यापूर्वी बेळगावला तिकीट देण्यात आले होते. आता दोन राज्यसभा सदस्य आहेत. दोन्ही जिल्ह्यातील जनता आणि नेते बंधुभावाने राहतात. यामुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संपूर्ण देशात आपला पक्ष मोठा असून सर्व निवडणुकीत आआपलाच विजय होणार हे निश्चित असल्याचा विश्वास प्रल्हाद जोशींनी व्यक्त केला. विधानपरिषदेच्या दोन्ही जागांवर आपलाच विजय निश्चित आहे, असा विश्वास प्रल्हाद जोशींनी व्यक्त केलाय शिवाय बेळगावमध्ये भाजप नेत्यांमध्ये झालेली दुफळी, मतभेद दूर सारून एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याच्या कडक सूचनाही त्यांनी दिल्या.
Check Also
बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू
Spread the love बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे …