कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीसाठी कोट्यावधी रुपयेची जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. दर्जेदार कामासंदर्भात माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी संबंधित कामाचे ठेकेदार व काम तपासणी अधिकारी यांना सक्तीच्या सूचना देऊन दर्जेदार काम होण्यासाठीचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला.
जल जीवन मिशन योजने अंतर्गत कोगनोळीमध्ये मुख्य रस्त्यासह गल्लोगल्ली खुदाई करून पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये काही ठिकाणी दोन फूट खोलीवरती पाईप लाईन टाकण्यात येत होती. ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास येताच माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी संबंधित कामाचे ठेकेदार यल्लाप्पा हुंदरे व वर्क इंस्पेक्टर श्रीशैल्य वरदायी यांना सूचना देऊन दर्जेदार कामाचा आग्रह धरला.
जल जीवन मिशन योजनेच्या टेंडरनुसार तीन फूट खोली, पितळी किंवा स्टीलचा सीएस हॉल आयएसआय मार्क पीव्हीसी पाईप पाईपलाईन, मुजवताना जीसीबीचा वापर न करता कामगारांच्याकडून मुजवण्यात यावी, जुनी कनेक्शन पूर्ववत जोडण्यात याव्यात, लोकांना उन्हाळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची सक्त ताकीद यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल गल्ली दरम्यान ज्या नवीन पाईपलाईन घातलेल्या आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाची पाहणी संजय पाटील, कृष्णात भोजे, संजय डुम, पद्मराज माणगावे यांच्यासमवेत वर्क इंस्पेक्टर श्रीशैल वर्धाई व कॉन्ट्रॅक्टर यल्लाप्पा हुंदरे यांनी केली.
यावेळी संजय डुम, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, कृष्णात भोजे, बुद्धीराज घस्ते आदीसह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त निपाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. …