बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थानतर्फे बेळगाव शहराच्या दक्षिण भागात डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस वितरण करण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू व चिकनगुनिया साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्या रविवार दि. ०३ जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव दक्षिणमधील विविध भागात रमाकांत कोंडूस्कर यांच्या उपस्थितीत डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अनगोळमधील जवळपास सर्व गल्ल्यांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राजहंस गल्ली, धर्मवीर संभाजी महाराज चौक, जय महाराष्ट्र चौक, वाडा कंपाऊंड, भांदूर गल्ली, कोनवाळ, नाथ पै नगर, बडमंजी नगर, बाबले गल्ली, स्वामी विवेकानंद रोड, कुरबुर गल्ली, कोरवी गल्ली, संत कनकदास कॉलनी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहापूर येथे अंबाबाई देवस्थानाजवळ नाथ पै चौक,
वडगाव येथे शिव मंदिर, आनंद नगर येथेही लसीकरण करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.