बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर व प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांची आज येळ्ळूर येथे डेंग्यू संदर्भात जनजागृतीची बैठक झाली. येळ्ळूर व आवचारहट्टी गावामध्ये डेंग्यू रोगाचे काही रुग्ण सापडले आहेत. यासाठी खबरदारी म्हणून ग्राम पंचायत येळ्ळूर व प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांची येळ्ळूर ग्राम पंचायत कार्यालयामध्ये बैठक घेऊन या बैठकीमध्ये डॉ. रमेश दडगी यांनी डेंग्यू संदर्भात माहिती दिली व डेंग्यू या आजाराची सुरुवात ज्या डासांपासून होते याची सविस्तर माहिती दिली व त्याच्यावर उपाययोजना सांगितल्या व त्याप्रमाणे डेंग्यू हा रोग रोखण्यासाठी संपूर्ण गावात औषध फवारणीला सुरूवात करण्यात येत आहे. तसेच गावातील सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना गल्लो गल्ली मध्ये स्पीकरच्या सहाय्याने आज देण्यात आल्या. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नंदुरकर, रमेश मेनसे, परशराम परिट, राकेश परिट, जोतिबा चौगुले, दयानंद उघाडे, राजू दोंन्याणावर, अरविंद पाटिल, पीडिओ अरुण नाईक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रमेश दडगी, सर्व आशा कार्यकर्त्या, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …