Saturday , October 19 2024
Breaking News

नगरसेवकांना प्रतीक्षा शपथविधीची!

Spread the love
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणूक होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरीदेखील अद्याप सभागृह अस्तित्वात नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी समारोह नाही त्यामुळे  नगरसेवकात नाराजी दिसून येत आहे. बेळगाव शहराला महापौर, उपमहापौर कधी मिळणार याकडे नगरसेवकांसह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
महापौर, उपमहापौर निवडणूक ही राजकीय आरक्षणात अडकून पडली आहे. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणावर अंतिम निर्णय झाल्यानंतरच महापौर निवडणूक होणार आहे. तोपर्यंत महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय राजवटीत चालणार आहे.
बेळगाव पालिकेवर प्रदीर्घ काळ प्रशासकीय राजवट लागू आहे. मार्च 2019 पासून महानगरपालिकेचे कामकाज प्रशासनाकडून चालू आहे. महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच इतका प्रदीर्घ काळ पालिकेचा कारभार प्रशासन सांभाळत आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकांना सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे आपल्या प्रभागातील समस्या कोणाकडे मांडायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी आपली अस्वस्थता बोलून दाखविली. अधिकार्‍यांना प्रभागातील समस्या सांगत असताना पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आपले ऐकत नाहीत. आपल्या प्रभागाच्या समस्या वेळेत सोडवत नाहीत, अशी तक्रार वजा खंत या नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *