मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
राष्ट्रपती पदासाठी शिवसेना एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौैपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेनेकडून आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. या निर्णयाला खरंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून उद्धव ठाकरे यांनी बहुतांश खासदारांच्या मागणीला मान देणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा द्यावा यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं होतं. याच मुद्द्यावरून शिववसेनेचे खासदारही फुटणार अशी चर्चा रंगायाला लागली होती. अखेर शिवसेना आपलं वजन द्रौपदी मुर्मू यांच्याच पारड्यात टाकणार असल्याचं दिसतंय. मात्र यावरून महाविकास आघाडीत फूट पडणार का? हे पाहावं लागणार आहे.
शिंदे गटाला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण
राष्ट्रपती पदासाठी होणार्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आली आहे. आता या बैठकीला शिंदे गट सहभागी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत. एनडीएच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.