बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण मोहीम वॉर्ड क्रमांक 10 येथे राबविण्यात आली. श्री साई दत्त मंदिर हेमु कलानी चौक येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाळकृष्ण गोपाळ तोपिन कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्या नेतृत्वाखाली सदर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. भरतेश मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्यातून शिबिर पार पडले.
यावेळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टिकोनातून सदर उपक्रम राबविण्यात आला असल्याने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजू मोदगेकर, राजू देसुरकर, ईश्वर नाईक, अभिजीत सरनोबत, सिद्धार्थ भातकांडे, श्रीकांत माने तसेच इतर त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर शिबिर सकाळी दहा वाजता सुरू झाले यावेळी गल्लीतील नागरिकांबरोबरच रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला.
प्रामुख्याने सदर शिबिरात मुजावर गल्ली, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, संभाजी गल्ली, ताशीलदार गल्ली, कांगले गल्ली, रामा मिस्त्री अड्डा, न्यू शिवाजी गार्डन पार्क, तांगडे गल्ली या भागातील नागरिक उपस्थित होते.