बेळगाव : शाहुनगर, बेळगाव येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांच्यावतीने मोफत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले.
पाटील बिल्डिंग, शिवबसव मार्ग, शाहुनगर, बेळगाव येथे आज, रविवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांतर्फे मोफत डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर आणि स्थानिकांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते, अंबिका महिला मंडळाच्या सदस्या आणि शाहुनगर येथील प्रभाग 33 मधील नागरिक उपस्थित होते. नगरसेविका रेश्मा पाटील, प्रवीण पाटील, पौंजी सर, रवी बागी, संतोष बोरकर, मंजू कापसे, बसू हपली, आदित्य पाटील, महांतेश इंचल, संजीव चौगले आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.