Saturday , October 19 2024
Breaking News

शिरगुप्पीच्या तरुणाचे दहशतवादी कनेक्शन!

Spread the love

 

बेळगाव : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी समाजविघातक कृत्यांमध्ये सामाजिक शांतता बिघडण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. केंद्रीय व राज्य गुप्तचर विभागही याचा तपास सुरू करीत आहे. याप्रकरणी दिल्लीतील रेहान अहमद सिद्दिकी याला अटक केली असता त्याच्या संपर्कात शिरगुप्पी (ता. कागवाड, जि.बेळगाव) येथील तौसिफ दुंडी हा तरुण असल्याचे स्पष्ट झाले. त्याला 31 जुलै रोजी अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
हिंदुत्ववादी संघटना, काही हिंदू नेते यांच्यावरील राग व्यक्त करण्यासाठी देशभरातील दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रेहान सिद्दिकी याला यापूर्वीच अटक केली. त्याची चौकशी करताना त्याने तौसिफशी संपर्क साधल्याचे उघड झाले आहे. रेहान व तौसिफ हे दोघेजण एका व्हाट्सअप ग्रुपवर होते. या ग्रुपवर बॉम्ब तयार करण्यास शिका अशी माहिती रेहानने दिली होती. ग्रामीण भागात फिरून मुस्लिम युवकांचा गट बनवा, त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्या, असे आवाहन रेहानने केले होते. त्याला अनुसरून तौसिफने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये, खेड्यांमध्ये फिरून मुस्लिम समाजावर कसा अन्याय होत आहे हे सांगत त्याने तरुणांमध्ये प्रक्षोभक वातावरण निर्माण केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. रेहानच्या दोन व्हाट्सअप ग्रुपमध्ये तौसिफ होता. यापैकी एका ग्रुपवर रेहान सातत्याने मेसेज करीत होता.
तौसिफवर भादवि कलम 1860 अंतर्गत 120 बी, 153, 153 ए व कलम 34 कलमाखाली कागवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

लिंगायताना कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Spread the love  पंचमसाली लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा बंगळूर : पंचमसाली लिंगायत समाजाला वर्ग-२ अ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *