मुंबई : शिवसेनेला संपवण्याचे खूप प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवत भगवा रोवलाय आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, राजकारणात हार जीत होत असते पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा आधार आहे. शिवसेना संपतेय आता केवळ भाजपच राहणार, असं जे. पी. नड्डा म्हणाले होते.
जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत अनेक वेळा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले. आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजप अध्यक्षांनी बोलून दाखवले. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी आव्हाने पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे. त्यामुळे राजकारणात हार जीत होत असते. पण कोणी कोणाला संपवण्याची भाषा याआधी आपल्या देशात राजकारण्यांकडून झाली नव्हती.