बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील हत्तरगीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या घटनेत एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 5 जण जखमी झाले.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वडूज गावातील साजिद मुल्ला आणि त्याचे कुटुंबिय कारने कित्तूरला अंत्यसंस्कारासाठी जात असताना सकाळी 8.30 च्या सुमारास हत्तरगीजवळ हा अपघात झाला.
या घटनेत सिद्दक साजिद मुल्ला हा 6 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले असून जखमींना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.