Sunday , December 22 2024
Breaking News

आपच्या आमदारांना भाजपकडून 20 कोटींची ऑफर : खासदार संजय सिंह

Spread the love

 

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून आम आदमी पक्षाकडून पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीही करून दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आमच्या आमदारांवर दबाव आणल्या जात आहे, असा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे.
‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आम आदमी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ‘आप’च्या आमदारांना फोडून भाजपाने मनीष सिसोदिया यांचा एकनाथ शिंदे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही., असे ते म्हणाले.
आमच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक आमदारांना 20-20 कोटींची ऑफर देण्यात येत आहे. हे 20 कोटी घ्या, अन्यथा मनिष सिसोदियांसारखा सीबीआय कारवाईचा सामना करा, अशी धमकी देण्यात येत आहे. ‘आप’चे आमदार अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार, यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी संपर्क साधला आहे, असा आरोपही संजय सिंह यांनी केला.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *