Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव दक्षिण मतदारसंघात स्थानिकाला उमेदवारी देण्यात यावी

Spread the love

 

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

बेळगाव : बेळगाव दक्षिणमतदार संघासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजीसत्र सुरु झाले असून इच्छुक उमेदवारांविरोधात काँग्रेसमधील विविध नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे.

२०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार रमेश कुडची, सरला सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरु असून काँग्रेसमधील हे दोन्ही उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची बातमी एका खाजगी वाहिनीवरून प्रसारित झाली होती. यानंतर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष परशुराम ढगे यांच्या नेतृत्वाखाली विविध काँग्रेस नेत्यांची सभा घेण्यात आली असून या सभेत परशुराम ढगे यांनी रमेश कुडची, सरला सातपुते यांच्या उमेदवारीवरून एससी मोर्चा, विणकर समाज, ओबीसी मोर्चा यासह विविध समाजाच्या नेत्यांनी विरोध दर्शविल्याचे सांगत राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. आज बोलाविण्यात आलेल्या सभेत दोन्ही इच्छुक उमेदवारांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा योग्य उमेदवार निवडण्यासंदर्भात आमदार सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणालाही उमेदवारी देण्यास आमचा आक्षेप नाही. मात्र उमेदवार अनुभवी, आपल्या मतदारसंघाविषयी पूर्ण माहिती असलेला आणि तळागाळापर्यंत काम करणारा असावा. या निकषातून उमेदवार निवडण्यात आल्यास दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नक्की निवडून येईल. विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता आल्यास दक्षिण मतदारसंघातील अधिकाधिक कामगारांना महामंडळात जागा देण्यात याव्यात, समाजाचा पाठिंबा असावा, यासाठी सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून ते घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील असू अशी प्रतिक्रिया देण्यात आली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, नगरसेवक खुर्शीद मुल्ला, आनंद शिरूर, भोजाप्पा हजेरी यासह इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *