बेळगाव : बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कल्पना जोशी यांचा पदग्रहण समारंभ रविवारी शहरातील जिल्हा काँग्रेस भवनामध्ये पार पडला. कल्पना जोशी यांची नुकताच ग्रामीण जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
बेळगाव, चिकोडी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारत जोडो या पदयात्रेच्या पूर्वतयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर पदग्रहण समारंभ पार पडला. भारतीयांच्या एकतीसाठी आणि पुढील पिढीच्या भविष्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो याचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या भारत एकता या पदयात्रेला सहभाग घेऊन पदयात्रा यशस्वी करावी म्हणून माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री गिरीमल पाटील, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनय नवलगट्टी चिकोडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळी तसेच महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सपना जोशी यावेळी सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.