Saturday , October 19 2024
Breaking News

धर्मांतर बंदी कायद्याअंतर्गत कर्नाटकात पहिला गुन्हा दाखल; आरोपीस अटक

Spread the love

बंगळूर : राज्य पोलिसांनी कर्नाटक धर्म स्वातंत्र्य संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल केला आहे, ज्याला धर्मांतर विरोधी कायदा देखील म्हणतात, जो या वर्षी ३० सप्टेंबर रोजी अधिसूचित करण्यात आला होता.
यशवंतपूर पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी कायद्याच्या कलम ५ अन्वये एफआयआर नोंदवला आणि उत्तर बंगळुरमधील बी. के. नगर येथील रहिवासी सय्यद मुईन याला अटक केली. चिकन स्टॉल चालवणाऱ्या मुईनवर 18 वर्षीय खुशबूला लग्नाचे आमिष दाखवून इस्लाम धर्मात आणल्याचा आरोप आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
खुशबूचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे असून, गेल्या १० वर्षांपासून बंगळुरमध्ये राहत आहे. तिचे वडील सुरेंद्र यादव हे व्यवसायाने चित्रकार आहेत. आई ज्ञानदेवी गृहिणी आहेत. या दाम्पत्याला आणखी दोन मुली आणि एक मुलगा आहे.
खुशबू बेपत्ता झाल्यानंतर पाच ऑक्टोबर रोजी ज्ञानदेवी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गेल्या सहा महिन्यांपासून खुशबूला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुईनसोबत तिची मुलगी पळून गेल्याचा संशय ज्ञानदेवीला होता. या तक्रारीत धर्मांतराचा उल्लेख नाही.
पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून खुशबूचा शोध सुरू केला. खुशबू तीन दिवसांनंतर आठ ऑक्टोबरला परतली आणि तिने इस्लामचा स्वीकार केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. ज्ञानदेवी आणि तिच्या पतीने खुशबूला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने मान्य केले नाही. १३ ऑक्टोबर रोजी ज्ञानदेवी यांनी बळजबरीने धर्मांतर केल्याचा आरोप करत आणखी एक पोलिस तक्रार दाखल केली.
नव्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी नवीन कायद्याचे कलम ५ लागू केले.
पोलिस उपायुक्त (उत्तर) विनायक पाटील, यांनी सांगितले, की आम्ही नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हे लग्नाच्या वचनावरून धर्मांतराचे प्रकरण आहे. पोलिस सूत्रानी सांगितले की, मुलीने स्वतःच्या इच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला असे दिसते, परंतु नवीन कायद्यानुसार निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे तिने पालन केले नाही.
ज्या व्यक्तीला तिचा धर्म बदलायचा असेल त्याने जिल्हा दंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना किमान ३० दिवस अगोदर फॉर्म- १ मध्ये एक घोषणा देणे आवश्यक आहे. धर्मांतर समारंभ करणार्‍या व्यक्तीने किमान ३० दिवस अगोदर फॉर्म २ दाखल करणे आवश्यक आहे.

About Belgaum Varta

Check Also

पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा निर्णय!

Spread the love  बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *