स्मरण व धवल यांना सुवर्णपदके
बेळगाव : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने विजयदुर्ग येथे सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन श्री दुर्गा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग वाघोटन खाडीवरती पाच, तीन व दोन किलोमीटर मुले, मुली आणि मास्टर्स गट याशिवाय एक किलोमीटर व पाचशे मीटर मुला-मुलींसाठी अशा विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावताना दोन सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्य अशी पाच पदके पटकावली. कुमार स्मरण मंगळूरकर याने मुलांच्या सीनियर गटात तीन किलोमीटरची स्पर्धा 33.48 मिनिटात संपून करून प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर धवल हनमनावरने मुलांच्या ज्युनिअर गटांमध्ये तीन किलोमीटरचे अंतर 36.29 मिनिटांमध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी श्रेष्ठा रोटी हिने मुलींच्या जूनियर गटांमध्ये तीन किलोमीटरचे अंतर 39.46 मिनिटात पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच सब ज्युनियर मुलींच्या गटामध्ये कुमारी दिशा होंडी हिने दोन किलोमीटरच्या अंतर 16.22 मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक मिळविला. कुमारी आरोही चित्रगार हिने एक किलोमीटर लहान मुलींच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविताना 11.32 मिनिटांची वेळ नोंदवली. कुमार युवराज मोहनगेकर याने दोन किलोमीटरच्या मुलांच्या स्पर्धेत 17.25 वेळ देत चौथा क्रमांक पटकावला. कुमारी राधिका मोहनगेकर, सुमेध गडकरी, वर्धन नाकाडी यांनी देखील या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली. वरील सर्व विजेत्या जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार यांचे मार्गदर्शन तसेच क्लबचे पदाधिकारी श्रीमती शुभांगी मंगळूरकर व श्री. सुनील हनमनावर यांचे प्रोत्साहन लाभते.