Monday , December 23 2024
Breaking News

अमेरिकेच्या आर्मीची दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांना धडकली, अनेक जणांचा मृत्यू

Spread the love

 

अमेरिकेत आर्मीच्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सची एकमेकांना धडक होऊन अपघात झाला असल्याची माहिती यूएस आर्मीने दिली आहे. ही घटना केंटकी येथे बुधवारी रात्री घडली. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स केंटकीमध्ये नियमित सरावादरम्यान उड्डाण करत होते, त्याचदरम्यान त्यांची टक्कर होऊन त्यांना आग लागली. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.

दोन HH-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स रात्री १० च्या सुमारास एकमेकांनी धडकली. ट्रिग काउंटीमध्ये नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान ही दुर्घटना घडल्याचे आर्मीचे प्रवक्ते नॉन्डिस एल. थर्मन यांनी गुरुवारी सकाळी एका निवेदनातून सांगितले.

ही हेलिकॉप्टर्स १०१ व्या एअरबोर्न विभागाची होती जे फोर्ट कॅम्पबेल येथे स्थित आहे. हा आर्मीचा एकमेव एअर असॉल्ट विभाग आहे. या विभागाने गुरुवारी पहाटे ट्विटरवर सांगितले की या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. पण नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

केंटकीचे गर्व्हनर अँडी बेशियर यांनी गुरुवारी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा राज्यात नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान आर्मीची दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली असल्याची भिती आहे. केंटकी राज्य पोलीस आणि राज्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग या अपघाताची माहिती घेऊन बचावकार्य करत असल्याचे त्यांनी ट्विटर पोस्टरद्वारे म्हटले आहे.

ब्लॅक हॉक फ्रंट लाइन युटिलिटी हेलिकॉप्टर आहे. अमेरिकेने व्हियतनाम युद्धानंतर त्याची निर्मिती केली होती. जगभरात अमेरिकेच्या अनेक मित्र देशांतील विशेष सशस्त्र दले या हेलिकॉप्टरचा वापर करतात. या हेलिकॉप्टरचा वापर विशेष मोहिमेदरम्यान केला जातो. ती अतिशय वेगवान आहेत. क्रू मेंबर्स दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे उड्डाण करत असताना केंटकीच्या ट्रिग काउंटीमध्ये दुर्घटनाग्रस्त झालीत. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *