बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. श्री. अमर यळ्ळूकर यांच्या प्रचारामध्ये आता रंगत येताना दिसत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील गल्ल्यामध्ये आज दिनांक 25 एप्रिल रोजी प्रचार फेरी काढण्यात आली. जत्तीमठ येथे पूजन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. पुढे केळकर बाग, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कंग्राळ गल्ली आधी प्रमुख गल्ल्यातून प्रचार फेरी काढण्यात आली व शेवटी संयुक्त महाराष्ट्र चौक या ठिकाणी प्रचाराचा शेवट करण्यात आला. प्रचार फेरीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विजयाचा निर्धार सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत होता. ऍड. श्री. अमर यळ्ळूकर यांच्या विजयाच्या जयघोष करण्यात येत होता. अनेक भागातील महिला मंडळ, युवक मंडळ तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. अनेक गल्ल्यांच्या नामफलकावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्याचे नमूद करण्यात आले होते. एकंदरीत शहराच्या मध्यवर्ती भागातील गल्ल्यांमध्ये यावेळी महाराष्ट्र एक किरण समितीचा उमेदवार निवडून देण्याचा निर्धार लोकांनी पक्का केल्याचे दिसून येत होते. विविध ठिकाणी महिलांनी अमर यळ्ळूकर यांचे ओवाळणी करून स्वागत केले. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून युवक मंडळांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचे स्वागत केले. जिजाऊ महिला मंडळ श्री शिव प्रजा युवक मंडळ सन्मान ऑटो रिक्षा स्टॅन्ड यासह अनेक महिला मंडळ आणि युवक मंडळांनी सहभाग घेतला. एकंदरीत शहरातील या प्रमुख भागामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. यावेळी अमर यळ्ळूकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्यासोबत गणेश बाडीवाले, उमेश जाधव, कल्लाप्पा रेडेकर, शोभा अळवणी, ज्योती सुतार, किरण बडवानाचे, गजानन पाटील, अभिजीत अष्टेकर, नरेश जाधव, सुहास चौगुले, सागर पवार, विलास कंग्राळकर यांच्यासह या सर्व भागातील प्रतिष्ठित नागरिक महिला आणि युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.