गदग : गदग जिल्ह्यातील नेरेगळ शहराच्या गद्दीहळजवळ केएसआरटीसी बस आणि टाटा सुमोची समोरासमोर धडक झाली.
गजेंद्रगडहून शिरहट्टी फक्कीरेश्वर मठाकडे निघालेल्या टाटा सुमोची गदग नगरहून गजेंद्रगडकडे जाणाऱ्या बसला धडक बसली. या घटनेत टाटा सुमोमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.
उत्तर-पश्चिम परिवहन बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
कलबुर्गी येथील कांहीजण टाटा सुमोतून शिरहट्टी येथील फक्कीरेश्वर मठाकडे दर्शनासाठी निघाले होते. मात्र, अचानक मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर बसची धडक बसली. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक कोंडी दूर केली. अपघातानंतर बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले.
टाटा सुमो पूर्णपणे चक्काचूर झाली असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसरत सुरू आहे. सहलीला आलेल्यांची बॅग आणि इतर पुराव्यांवरून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.