येळ्ळूर : येळ्ळूर गावचे सुपुत्र, आनंद नगर वडगाव येथील रहिवाशी, आदर्श विद्यामंदिर कॉम्पोझिट ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक, आनंद नगर रहिवासी मंडळ, शिव मंदिर ट्रस्ट वडगावचे माजी अध्यक्ष, समाज शिक्षण संस्था येळ्ळूरचे संचालक, प्राध्यापक बळीराम लक्ष्मण कानशिडे यांचे 82 व्या वर्षी यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. आज मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वडगाव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
अनेक वर्षे त्यांनी “बेळगांव वार्ता”चे संपादन केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा एक, मुलगी, सून, जावई व नात असा परिवार आहे.