लक्ष्मणराव चिंगळे; तालुका प्रशासनातर्फे कनकदास जयंती
निपाणी (वार्ता) : १५ व्या शतकामध्ये संत कनकदासांनी अंधश्रद्धा, जातीयतेविरुद्ध कीर्तन आणि साहित्याद्वारे संपूर्ण राज्यभर प्रचार केला. त्यांनी संत मार्ग पत्करून मानव जातीच्या कल्याणासाठी प्रवचन, कीर्तन आणि साहित्याद्वारे आदर्श जीवनपाठ घालून दिला. कनकदासांनी मानव कल्याणासाठी आयुष्य खर्ची घातले, असे मत चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालयात प्रशासन व तालुका धनगर समाजातर्फे आयोजित संत कनकदास जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार मुजफ्फर बळीगार होते.
तहसीलदार बळीगार यांनी संत साहित्याने शेकडो वर्षांपूर्वी दिलेल्या अनमोल विचारावर आजच्या समाजाची वाटचाल सुरू असून, संताचे विचार कृतीतून जोपासणे गरजेचे आहे.
उपतहसीलदार मृत्युंजय ढंगी यांनी स्वागत केले. तहसीलदार बळीगार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. चिंगळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रवीकुमार हुक्केरी, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, आहार निरीक्षक अभिजित गायकवाड, निपाणी तालुका धनगर समाज उपाध्यक्ष श्रीकांत बन्ने, कार्याध्यक्ष एस. के. खज्जनावर, महादेव कौलापुरे, बाळू कोळेकर, कल्लाप्पा ढोणे, सिद्धलिंग चिगरे, सिद्ध नराटे, मुरलीधर कोळेकर आदी उपस्थित होते.