बेळगाव : बेळगावातील सांबरा गावात विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत बस सुविधेची मागणी करत आंदोलन केले. विद्यार्थ्यांना शक्ती योजनेमुळे समर्पक बससेवा मिळत नसल्याचा संताप बेळगाव ग्रामीण मंडळाचे भाजप अध्यक्ष धनंजय जाधव यांनी व्यक्त केला असून मोफत बस प्रवासाची योजना जनतेची डोकेदुखी बनली आहे.
बेळगावातील सांबरा गावात विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत बस सुविधेची मागणी करत आंदोलन केले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले असून 19 उपयुक्त प्रकल्प रद्द करण्यात आले असून, शेतकर्यांना रु. 4000 बंद केले आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांचा विद्यानिधी रोखला आहे, विजेअभावी लोडशेडिंग सुरू आहे, महिलांना 2000 देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. विद्यार्थ्यांसाठी बसची योग्य व्यवस्था नाही. शक्ती योजनेत महिलांचा मोफत बस प्रवास लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. विद्यार्थी सकाळी 9 वाजता बसस्थानकावर जाऊन थांबून बसतात, बस वेळेवर शाळेत पोहोचत नसल्याने, शाळा ५ वाजता बंद होते पण बस नसल्याने विद्यार्थी रात्री ८ आणि ९ वाजता घरी येतात. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी आक्रोश करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. आंदोलनात विक्रम सोंजी, मल्लाप्पा कांबळे, सांबरा ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. रचना गावडे, उपाध्यक्ष मारुती जोगणी, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक जत्राटी, अविनाश परीट, धर्मेंद्र तळवार, कल्लाप्पा पालकर, विलास खनगावकर, मनोहर जोई, राहुल कोवळे, शारदा पाटील, शांता देसाई, श्वेता बामनवाडी, सपना तळवार, लक्ष्मी देसाई, कल्लवा करेगार यांच्यासह शेकडो विद्यार्थी, ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.