बसवेश्वर पोलीस ठाण्यातर्फे जनजागृती रॅली
निपाणी (वार्ता) : हेल्मेट नसल्याने वर्षभरात झालेल्या विविध ठिकाणी दुचाकी स्वारांच्या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. महामार्गावर अशा अपघातांची संख्या मोठी आहे. हे अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकी सरांनी हेल्मेट वापरून आपला जीव वाचवण्याचे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी केले. येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे शनिवारी शहरात विविध ठिकाणी हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
येथील बसस्थानक सर्कल मधून या जनजागृतीला सुरुवात करण्यात आली. येथील चिक्कोडी रोड, गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर अशोकनगर कित्तूर चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजीराजे चौक, अक्कोळ क्रॉसवरील न्यायालय आणि परिसरात ही रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी रॅली थांबून दुचाकीस्वारांना हेल्मेटबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उपनिरीक्षक रमेश पवार यांनी, यापूर्वी शहर पोलीस ठाण्यातर्फे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. आता बसवेश्वर चौक पोलीसातर्फे ही सक्ती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकानी नियमाचे पालन करून अपघाताच्या वेळी आपला जीव वाचविण्याचे आवाहन केले. यावेळी उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल यांच्यासह बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.