निपाणी (वार्ता) : येथील गोसावी, मकवाने समाजाच्या वतीने दिवंगत विश्वासराव शिंदेनगर येथे तिरंगा स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.२) नगरसेवक रवींद्र शिंदे, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, युवा उद्योजक इमरान मकानदार, शिरीष कमते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला ३० हजार आणि चषक, उपविजेत्या संघाला २० हजार आणि चषक, तृतीय क्रमांकासाठी १० हजार व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये एकूण ४८ संघानी सहभाग घेतला आहे.
प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, गोसावी समाजातील तरुणांनी खेळाकडे आकर्षित व्हावे. व्यसनांपासून दूर जावून शारीरिक व्यायामाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस दिली जाणार आहेत.