Friday , October 18 2024
Breaking News

छ. शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी ‘नवहिंद क्रीडा केंद्रा’ची 5 लाखची देणगी

Spread the love

 

येळ्ळूर : हिंदुस्थानचे आराध्यदैवत छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या आपल्या येळ्ळूर गावात महाराजांची पंचधातूची मूर्ती स्थापन व्हावी, ही गावकऱ्यांची ईच्छा पूर्णत्वाच्या मार्गावर असून आज खऱ्याअर्थाने ‘नवहिंद परिवारा’ने दिलेल्या 5 लाख रुपयांच्या भरघोस देणगीने शिक्कामोर्तब झाले आहे. ‘नवहिंद’ने आधुनिक येळ्ळूर गावच्या जडणघडणीत आपलं योगदान दिले आहेच. आज खरोखर आम्ही भारावून गेलो आहोत. नवहिंदच्या कार्यकर्त्यांची कार्यशैली आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी राहिल, असे मनोगत ‘हिंदवी स्वराज्य संघटने’चे अध्यक्ष प्रशांत मजुकर यांनी व्यक्त केले. ‘नवहिंद भवना’त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवहिंदचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर होते.
सेक्रेटरी अनिल हुंदरे यांनी प्रास्ताविक करून नवहिंदचे पाठबळ कायम तुमच्या पाठीशी राहील,अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, प्रियदर्शनी नवहिंद महिला पतसंस्थेच्या चेअरपर्सन सौ. माधुरी पाटील, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. नम्रता पाटील, हिंदवी स्वराज्य संघटनेचे सेक्रेटरी चांगदेव मुरकुटे, वाय. एन. पाटील, प्रदीप मुरकुटे, उदय जाधव, सी. बी. पाटील, नारायण बस्तवाडकर, दत्ता उघाडे, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, दशरथ पाटील, वाय. सी गोरल, आनंद पाटील, परशराम कंग्राळकर, आनंद मजकुर, सुरेखा सायनेकर, सुलभा पाटील, वैशाली मजुकर, सुनिता कणबरकर, शितल बस्तवाडकर, रेखा पाटील, राजश्री दणकारे, रेखा य. पाटील, कीर्ती ठोंबरे आर. वाय. ठोंबरे, संतोष अष्टेकर, प्रमोद जाधव, पंकज जाधव, नितीन कुगजी, सुधीर माणकोजी, प्रताप पाटील, हणमंत पाटील, दिनेश पाटील, वाय. पी. देसूरकर, नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, हिंदवी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आदि मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *