बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 28 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
अन्नपूर्णा महिला मंडळाच्या अध्यक्षा मेधा पुरव सामंत, पुणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
नामवंत साहित्यिक, नाटककार व पत्रकार आचार्य अत्रे यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आचार्य अत्रे यांचे विविध क्षेत्रातील कार्य ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना राहाणार आहे.
चार सत्रात हे संमेलन होणार आहे. पहिल्या दोन सत्रात आचार्य अत्रे यांच्या साहित्य व पत्रकारितेवर आधारित व्याख्याने होणार आहेत. दुपारच्या सत्रात परिसंवाद व निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे.
प्रगतिशील लेखक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.