बेळगाव : दोन कारची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले.
मृत्युमुखी झालेल्यांची नावे मंगला महांतेश भरमनायकर (50, रा. लड्डीगट्टी, बैलहोंगल) आणि चालकाचे नाव श्रीशैला सिद्धनगौड नागनगौडर (40, रा. संपगाव) अशी आहेत.
रायनायका भरमनायकर (87), गंगाव्वा रायनायका भरमनायकर (80), मंजुळा श्रीशैल नागनगौडर (30), चालक सुभानी लालसाब वकुंड (28, रा. इंचल) यांना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती की, बैलहोंगल येथील भरमनायकर यांचे कुटुंब 18 जानेवारी रोजी होणाऱ्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी कपडे खरेदी करण्यासाठी कोन्नूर गावात गेले होते. समोरून येणारी कार इंचल येथून राज्य महामार्गावर जात असताना इंचल गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा अतिरिक्त एसपी वेणुगोपाल एम., डीवायएसपी रवी नाईक, मुरगोड पीआय इरयय्या मठपती यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.