बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील विद्या नगर येथे राहणाऱ्या सिद्धनगौडा बिरादार यांना गेल्या नोव्हेंबरमध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये उकळून फसवणूक करून पळून गेलेल्या 6 जणांच्या टोळीला काकती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धनगौडा हे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नातेवाईक आहेत. पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये उकळून फसवणूक करून पळून गेलेल्या टोळीला काकती पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या विद्यानगरमध्ये राहणारे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय सिद्दनगौडा बिरादार यांची त्यांनी फसवणूक केली होती. या पार्श्वभूमीवर सिद्दनगौडा बिरादार यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करून आता सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे. या भामट्याने आणखी कोणाकोणाला चुना लावलाय याचा पोलीस शोध घेत आहेत.