बेळगाव : एंजल फाऊंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी आज 10000/- रुपये महिला संघ हॉकी खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी दिले आहे.
यावेळी महिला हॉकीपटुना मीना बेनके यांची मुलगी एंजल बेनके या चिमुकलीच्या हस्ते सदर रक्कम सुधाकर चाळके यांना देण्यात आली.
यावेळी बोलताना मीना बेनके यांनी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच अभ्यासाचे महत्त्व सांगितले. कोणत्याही मदतीची गरज भासल्यास एंजल फाऊंडेशन एका कॉलवर मदत करण्यासाठी सदैव उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांनी मदत व मार्गदर्शनासाठी मीनाताई बेनके यांचे आभार मानले. याप्रसंगी बेळगाव हॉकीचे प्रशिक्षक तसेच खेळाडू उपस्थित होते.