बेळगाव : न्यू गुडशेड रोड येथील नर्तकी प्राईड व किरण प्लाझा या अपार्टमेंट मधील रहिवासी गेल्या सात ते आठ वर्षांपासून तेथील वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करतात, यावर्षी पुरुष, महिला व मुलांसाठी क्रिकेट, लगोरी, कॅरम, बॅडमिंटन व लिंबू चमचा आशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धांच्या बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. विकास कलघटगी तर व्यासपीठावर नंदकिशोर नागोरी, रमेश पोरवाल, वनश्री पाटील उपस्थित होते.
नर्तकी परिवाराच्या या स्पर्धा म्हणजे येथील राहिवाश्यांचा हा कौटुंबिक सोहळा असून यातून सामाजिक बांधिलकी दिसून येते, विविध भाषिक, सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन या स्पर्धांचे आयोजन हे कौतुकास्पद आहे, यापुढेही आशा स्पर्धातून सामाजिक उपक्रम नर्तकी परिवाराने राबवावेत असे मनोगत विकास कलघटगी यांनी व्यक्त केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, तर धनंजय पाटील यांनी विजेत्या स्पर्धकांना चषक देणगी दाखल दिले, नितेश जैन, महेश शर्मा, किरण शर्मा, राकेश साकरिया, संदीप जाधव, रघु ओझा, भरत मंगलाणी, उत्तम गुर्जर, मनीष मुंदडा, नटवर मोदानी, हर्षद शहा, प्रीतम शहा, अजय चौधरी, बादल पोरवाल, हणमंत जाधव, अतुल पोरवाल, कुणाल जैन, अतिष, लाविष जैन, भावेश जैन, राहुल नागोरी, कुलदीप रतणोजी, मालतेश नाईक, कौशिक पोरवाल, अंकित पोरवाल, कैलाश जैन, ओंकार कलघटगी, जय पाटील, दुर्वांक पाटील, हर्षित मोदानी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.