बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाची बैठक बिजगर्णी हायस्कूलमध्ये संपन्न झाली. अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे होते
संस्थेचे अध्यक्ष कै. गुंडू भास्कळ यांचं निधन झाले. त्याप्रित्यर्थ संस्था व शाळेतर्फे शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
सुरूवातीला कै. गुंडू भास्कळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
पुंडलिक जाधव यांनी प्रास्ताविक करुन कै. गुंडू भास्कळ यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एस. पी. सोरगावी, माजी मुख्याध्यापक वाय. एच. पाटील, एम. एम. जाधव, पी. पी. बेळगावकर, निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ, मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सर्व शिक्षकवर्ग, तसेच यल्लापा बेळगावकर, मनोहर पाटील, अब्दुल नावगेकर, सातेरी जाधव, संस्था सचिव ए. एल. निलजकर, पी. एस. भाष्कळ, धनाजी कांबळे, बबनराव जाधव, प्रभाकर जाधव, एस. एम. जाधव, मल्लापा भास्कळ, सुरेश कांबळे, मनोहर ओ. मोरे, सल्लागार समितीचे सदस्य, भास्कळ कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
शेवटी आभार आर. एम. कांबळे यांनी मानले.
यावेळी संस्थेची बैठक घेऊन संस्थेचे नूतन अध्यक्ष म्हणून एस. आर. मोरे व उपाध्यक्षपदी एस. एम. जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.