बेळगाव : हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटकशी संलग्न असलेल्या हॉकी बेळगाव संघटनेतर्फे येत्या सोमवार दि. 8 ते शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 या कालावधीत मुला -मुलींच्या भव्य आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस (लेले) मैदानावर ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविली जाणार आहे. सदर स्पर्धेत 12 महाविद्यालयीन आणि 9 शालेय अशा एकूण 21 संघांनी भाग घेतला आहे. महाविद्यालयीन आणि शालेय संघांचे प्रत्येकी दोन गट करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहेत. महाविद्यालयीन विभाग ‘अ’ गट : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, पीपल ट्री कॉलेज. ‘ब’ गट : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज, संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, बी. के. कॉलेज. शालेय विभाग ‘अ’ गट : एम. आर. भंडारी हायस्कूल, ज्ञानमंदिर हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, वाय. एम. शानभाग हायस्कूल. ‘ब’ गट : एम. आर. भंडारी हायस्कूल, जी. जी. चिटणीस हायस्कूल, ज्ञान मंदिर हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल काकती, ताराराणी हायस्कूल खानापूर.
सदर स्पर्धेअंतर्गत 12 जानेवारीपर्यंत एकूण 46 हून अधिक हॉकी सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 9 सामने होणार असून उद्घाटनाचा सामना सोमवार दि. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता गोगटे कॉलेज आणि पीपल ट्री कॉलेज यांच्यात खेळविला जाणार आहे.