उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या 22 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाची मुहूर्तमेढ कार्यक्रम सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता या भागातील जागृत असे मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्योदय महिला मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक बी. एस. होनगेकर हे असून मूहूर्तमेढ क्लासवन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मण्णूरचे डी. एम. चौगुले व सौ. रेखा देवाप्पा चौगुले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सरदार हायस्कूलचे प्राध्यापक रणजीत चौगुले हे उपस्थित राहणार आहेत तर मळेकरणी देवीचे पूजन इंजिनियर व क्लास वन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन नागेंद्र तरळे व सौ. मोहिनी सचिन तरळे यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतच्या अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण खाचो तेरसे हे उपस्थित राहणार आहेत. तरी उचगाव आणि या भागातील सर्व साहित्यिक प्रेमींनी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम – पाटील यांनी केले आहे.