यरगट्टी तालुक्यातील भीषण घटना
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील कुरुबगट्टी क्रॉसजवळ इरटीगा आणि शेवरोलेट यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची भीषण घटना घडली आहे.
या घटनेत एक महिला आणि एका मुलासह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात मुथ्थू नाईक (8), गोपाळ नाईक (45) आणि अन्नपूर्णा (53, रा. धारवाड) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
या घटनेत कारमधील अन्य दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुरगोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला.