नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल.
या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार दुर्मिळ तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे, तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एनडीएमध्ये धक्का देण्याची आशा करत आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणकू घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते, ती सुद्धा उद्याच होणार आहे.