बेळगाव : शहर पोलीस आयुक्तपदी लाडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश शासनाने जारी केला आहे. बेळगाव हिवाळी अधिवेशन सक्षमपणे चालवण्यात लाडा मार्टिन यांचा मोलाचा वाटा होता. लोकस्नेही पोलीस प्रशासनाचा ते आदर्श आहेत. आता त्यांची बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
लाडा मार्टिन हे 2009 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत जे सध्या भर्ती विभागात डीआयजीपी म्हणून कार्यरत आहेत.
पोलिस आयुक्त असलेले सिद्धरामप्पा एस. एन. 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आता लाडा मार्टिन यांची नियुक्ती केल्याचा आदेश जारी केला आहे.