Monday , December 23 2024
Breaking News

काँग्रेसचे पैसे वाटणाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले!

Spread the love

 

गोकाक : गोकाकमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि टीमकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेली रक्कम भाजपा कार्यकर्त्यांनी जप्त करून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना आज घडली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास आलेल्या पाच जणांना भाजप समर्थकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पराभवाच्या भीतीने मते विकत घेण्यासाठी एका घरात लाखो रुपये ठेवले होते. याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहात पकडले. घरोघरी प्रत्येकी एक हजार रुपये वाटणाऱ्या पाच जणांना पैशांसह रंगेहात पकडण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत गोकाकमधून काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. महांतेश कडाडी, भद्रावती येथील दोन युवक, हर्षा शुगर कारखान्यात काम करणारे दोन कर्मचारी यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येत आहे.
यावेळी मतदारांना वाटण्यासाठी आणलेली 20 लाख रुपयांची रक्कम भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *