बेळगाव : बेळगावचे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव लिखित “प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला पलपब पब्लिकेशन संस्था, अहमदाबाद (गुजरात) या संस्थेचा “पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार 2024” हा उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद (गुजरात) ही संस्था गुजरात राज्यात मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे. या संस्थेच्या संस्थापिका लीना पाटील या मूळच्या कराडच्या असून सध्या वास्तवास अहमदाबाद गुजरात येथे आहेत. तेथून त्या मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करणाचे आदर्श कार्य जोमाने करत आहेत.
कराड येथे पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद याच्यावतीने गेल्या रविवार दि. 26 मे 2024 रोजी एक दिवशीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राजदूत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, प्रसिद्ध लेखक डाॅ. ज्ञानेश्वर मुळे, प्रसिद्ध इतिहासक डाॅ. विनायक जाधव, संमेलनाचे आयोजक सिध्दार्थ पाटील, लीना पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील साहित्यिक व उत्कृष्ट साहित्यकृतीचा पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर संमेलनात अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या “प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीचाही सन्मान करण्यात आला. या साहित्यकृतीला मिळालेला हा नववा राज्यस्तरीय वाड्:मय पुरस्कार आहे. या पूर्वी अर्जुन जाधव यांच्या जागर , बेळगाव कुणाच्या बापाचं, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, बागलकोटची सुगंधा, लेक जगवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती आणि व्यसनमुक्ती.. इत्यादी साहित्य संपदा प्रसिद्ध झाल्या असून आजपर्यंत महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळ याचे पुरस्कार मिळाले आहेत.
आता त्यांची केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या पंतप्रधान घरकुल योजनेवर, घरकुल घोटाळ्यावर आधारित नव्या दमाची नवी कादंबरी “ग्रामपंचायत एक वाटणीदार अनेक..” या नावाने लवकर प्रसिद्ध होणार आहे.